। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत नगरपरिषद हद्दीतील डेक्कन जिमखाना कचेरी रोडलगत तुषार खवणेकर यांच्या घरावर बुधवारी (दि.10) रात्री अकराच्या सुमारास झाड पडुन घराचे नुकसान झाले, परंतू कुठलीही जिवीतहानी झाली नाही.
खवणेकर हे गेल्या पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळ कचेरी रोडजवळ श्रीराम मेढी चाळीत राहत आहेत. त्यांच्या घराशेजारी सुमारे शंभर वर्ष जुने असेलेले आंब्याचे झाड मागील तीन-चार दिवसांपासुन सुरू असलेल्या पावसामुळे बुधवारी रात्री मुळापासुन तुटून घरावर पडले. त्यामुळे घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
हे कुंटूब रात्री झोपण्याच्या तयारीत असताना अचानक रात्री अकराच्या सुमारास मोठा आवाज होऊन घरातील भिंत अर्धवट खाली आली, ही बाब मुलीच्या लक्षात येताच त्यांनी घरातील इतर सदस्यांना घरावर झाड पडल्याची कल्पना दिली. सर्व कुंटुंब क्षणात घराबाहेर पडल्याने पुढील अनर्थ टळला. याबाबत तहसिलदार विक्रम देशमुख मदतीसाठी तातडीने माणसे पाठवली, पण दुसर्या दिवशीही नगपरिषेदच्या आपत्कालीन विभागाला झाड काढण्यास अपयश आले. झाड अजुनही त्याच स्थितित आहे.