। कोर्लई । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यात दमदार पडलेल्या पावसामुळे अलिबाग-मुरुड रस्त्यावर सर्वे खिंडीतील नांदगाव वाघोबा मंदिर रस्त्यावर झाड पडल्याने काही वेळ वाहतूकीवर परिणाम झाला होता. मात्र, सुदैवाने जीवित व वित्त हानी टळली आहे. तालुक्यातील या रस्त्यावर सर्वे खिंड येथे रात्रीच्या वेळेस सागाचे तर पहाटेच्या वेळेस वाघोबा मंदिर रस्त्यावर वडाचे महाकाय झाड पडल्याचे वृत्त समजताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता रमेश गोरे व शाखा अभियंता यू.एस.राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक स्थापत्य अभियंता प्रफुल्ल घोलप, रोशन पाटील, गणेश मार्कंड, संदीप घुले, दर्शन मिठागरे, सावंत तसेच स्थानिकांच्या मदतीने हे झाडे तोडून रस्त्याच्या बाजुला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
नांदगाव रस्त्यावर झाड कोसळले
