शाळेवर झाड कोसळले

सुदैवाने जीवितहानी टळली

। पनवेल । वार्ताहर ।

नवीन पनवेलमधील के.आ. बांठीया शाळेजवळ सतत कोसळणार्‍या पावसामुळे भलेमोठे झाड पडल्याची घटना शुक्रवारी घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

रायगड जिल्ह्यासह पनवेल तालुक्यात शुक्रवार सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार बरसत असलेल्या या पावसामुळे पनवेल परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या, तसेच वाहतुकीची कोंडीही झाली आहे. या पावसामुळे नवीन पनवेल येथील के.आ. बांठीया शाळेजवळील असलेले भलेमोठे झाड पडले. यावेळी शाळा नुकतीच शाळा सुटली होती. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली आहे. दरम्यान, झाड पडल्यामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांचे नुकसान झाले आहे.

Exit mobile version