कोलाड येथे खैर वाहतूक करणारा ट्रक वनरक्षकांच्या जाळ्यात

। गोवे-कोलाड । विश्‍वास निकम ।
मुंबई-गोवा हायवेवरील कोलाड सुपर मार्केटजवळ अवैध खैर वाहतूक करणारा ट्रक कोलाड वनरक्षक अधिकारी यांनी सापळा रचून पकडला आहे. ही घटना बुधवारी (दि. 1) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. भिवंडी येथील पडगा येथून चिपळूण सावर्डे येथे खैर भरून जाणारा ट्रक गाडी नंबर जीजे 15. एटी 7851 हा कोलाड येथील सुपर मार्केटजवळ वनरक्षक अधिकारी कांबळी व अजिंक्य कदम यांनी सापळा रचून पकडला.या गुन्ह्यातील आरोपी नजमुद्दीन याल वनरक्षक अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले असून पुढिल तपास सुरु आहे.

Exit mobile version