रत्नागिरीत दुमजली इमारत कोसळली

| रत्नागिरी | प्रतिनिधी |

रत्नागिरीतून खेड शहरात असलेली दुमजली इमारत कोसळली आहे. मंगळवारी (दि. 25) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झालेली नाही. या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातील हमदुले चाळ येथे दुमजली इमारत होती. खेड नगरपालिकेने ही मे महिन्यात ही इमारत धोकादायक म्हणून घोषित केली होती. यानंतर इमारत पूर्णत: खाली करण्यात आली. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही इमारत कोसळली आहे. सध्या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडपडीच्या तसेच दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे घाटमाथ्यावर येणाऱ्या पर्यटकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version