करिअर कोचिंग क्लासचा अनोखा उपक्रम

विद्यार्थ्यांसाठी आणले आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्गदर्शक

| खोपोली | प्रतिनिधी |

दहावी बारावीच्या परीक्षा सध्या तोंडावर आहेत. असंख्य विध्यार्थी सध्या बोर्ड परीक्षेच्या तणावाखाली आहेत. अभ्यासाचे नियोजन कसे करायचे? परीक्षेला कसे सामोरे जायचे? अशा प्रकारचे असंख्य प्रश्न सध्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात घुटमळत आहेत. याच प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी खोपोलीतील करिअर कोचिंग क्लासेसच्या वतीने ‘आय लव्ह एग्झाम’ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्गदर्शक सुनिल सावंत यांना पाचारण केले.

खोपोलीतील लायन्स क्लबच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात सातशे पालक आणि विद्यार्थी सहभागी होते. बोर्डाच्या परीक्षेला सकारात्मक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन कसा अभ्यास करावा, येणाऱ्या एका महिन्यात अभ्यासाचे नियोजन कसे करावे, परीक्षेची भीती न बाळगता परीक्षेवर प्रेम करून परीक्षेत आणि आयुष्यात यश कसे मिळवावे या सर्वांची उत्तरे देत असताना आणि विध्यार्थ्यांच्या मनातून परीक्षेची भीती दूर करताना अतिशय समर्पक उदाहरणे सुनील सावंत यांनी दिली.

यावेळी उल्हासराव देशमुख, दिलीप पोरवाल, दिनकर भूजबळ यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमास लाभली. करिअर कोचिंग क्लासचे माजी विद्यार्थ्यी प्रथम बावीसकर, वेद मुंबईकर आणि सुमित दे यांची उपस्थिती होती.

Exit mobile version