ग्रामस्थांच्या आंदोलनाला महाविकास आघाडीचा पाठिंबा
| पनवेल | प्रतिनिधी |
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 30 सप्टेंबरपर्यंत सुरू करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने कंबर कसली आहे. विमानतळ युद्धपातळीवर प्रकल्पात काम सुरू आहे. मात्र, सध्या या विमानतळ प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनी संपादित झाल्यात अशा प्रकल्पग्रस्तांचा एक गट मात्र आंदोलनाच्या पवित्र्यात असून, त्यांनी रविवारी पळस्पे ते जेएनपीटी या मार्गावरील नांदगाव टेकडीवर चढाई करून सरकारला हाक मारण्याचे अनोखे आंदोलन केले.
विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव मिळावे, तसेच विमानतळात ज्यांच्या जमिनी संपादित झाल्या आहेत, त्यांच्या कुटुंबियांना विमानतळामध्ये रोजगार मिळावा आणि पुनर्वसन पॅकेज देताना केलेल्या आश्वासनांची पूर्तता करा, या तीन मुख्य मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त तरुण एकवटले होते. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने माजी आ. बाळाराम पाटील, शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते बबनदादा पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्रजी पवार साहेब गट) महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भावना घाणेकर, राजेंद्र पाटील, दहा गाव समिती अध्यक्ष नाथा पाटील, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील, सचिन केणी, विजय शिरढोणकर, विश्वास पेटकर, दिलीप पाटील, सुरेश पाटील, लिलाधर भोईर, ॲड. विक्रांत घरत, विजय शिरढोणकर, राहुल मोकळ, प्रदीप म्हात्रे, मोहन घरत, मच्छिंद्र घरत, किरण केणी महेंद्र मुंगाजी, कवी तारेकर, विवेक मोकळ, सुहास पाटील, रुपेश मोहिते, सुधाकर कोळी, पुंडलिक म्हात्रे, ॲड. प्रशांत भोईर, सुनील म्हात्रे, रोशन पाटील कोपर, बाळा नाईक सरपंच, महेंद्र नाईक, प्रकाश नाईक, संदीप नाईक, प्रकाश डाऊर, विनायक पाटील, तानाजी तारेकर, मिलिंद तारेकर, सुशील तारेकर, गुरुनाथ तारेकर, प्रवीण मोकळ, अमित म्हात्रे, अजय तारेकर, वैभव म्हात्रे, विजय पाटील, राम पाटील, प्रल्हाद केणी, अनिल पाटील, कुमार पाटील, वैभव पाटील, संदीप केणी संजय अं. पाटील संजय गं. पाटील, मिलिंद घरत, दिलीप मुंडकर, अनिल पाटील सरपंच, वाघीवली सर्व ग्रामस्थ, समीर मुंडकर, सुहास पाटील, दिलखुष केणी, अतिश पाटील, संतोष गावंड, जगदीश केणी, रोहिदास गोंधळी, जितेंद्र मुंडकर. नंदकुमार मुंडकर, निखिल भोपी, नितेश पाटील, संजय पाटील, राहुल केणी, प्रवीण केणी, भूपेंद्र केणी, सूरज केणी, धीरज केणी, विजय केणी, धीरज परदेशी, बळीराम पाटील, राम पवार, राजाराम पाटील, विक्रांत घरत, सचिन केणी, सुधाकर कोळी, प्रदीप म्हात्रे, मछिंद्र घरत, किरण केणी, मोहन घरत आदींसह परिसरातील हजारो ग्रामस्थ सहभागी झाले होते.







