सामाजिक ऐक्याचे अनोखे दर्शन

। सोगाव । वार्ताहर ।

अलिबाग तालुक्यातील सोगांव येथील मापगांव माजी उपसरपंच वसीम कुर यांनी दीपावलीच्या पूर्वसंध्येला येथील हिंदू बांधवांसोबत मिठाईचे वाटप करत सामाजिक ऐक्याचे अनोखे दर्शन घडविले आहे. सोगांव येथील वसीम कुर हे गेल्या अनेक वर्षांपासून सोगांव पंचक्रोशीतील गरीब आदिवासी बांधवांसह इतर समाजातील बांधवांनाही दिवाळीसह इतर सण मोठ्या आनंदात साजरा करत असतात. यावेळी त्यांनी दिवाळीचे औचित्य साधून सोगांव व चोरोंडे आदिवासीवाडी, सोगांव आगरआळी, बौद्धवाडी, चोरोंडे, मुनवली येथे मोठ्या प्रमाणात मिठाईचे वाटप केले.

यावेळी वसीम कुर यांच्यासोबत विजय भगत, मजीद कुर, मुदस्सर कुर, बाबू सोंडे, किफायत कुर, सलमान कुर, स्नेहा रुत, माहिद कुर, आशिष पाटील, अक्षय भगत, अधू भगत, शफी वाकनिस, रमीज कुर, सादिक कुर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version