| ठाणे | प्रतिनिधी |
जगात अनेक विद्यापीठे असली तरी माणूस घडविणारे खरे विद्यापीठ हे रेवदांड्याला असल्याचे प्रशसोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी नवी मुंबई येथे काढले. राजस्थान येथील जगदीशप्रसाद झाबरमल टीबरेवाला विद्यापीठच्या वतीने सचिन धर्माधिकारी यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले. वाशीतील सिडको एक्झीबीशन सेंटर येथे आयोजित दीक्षांत सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉ. धर्माधिकारी, विद्यापीठचे अध्यक्ष डॉ. विनोद टीबरेवाला, स्वरुपा सचिन धर्माधिकारी, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, खासदार पूनम महाजन, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, तसेच मुंबई आणि कोकणाच्या कानाकोपर्यातून मोठ्या संख्येने आलेले सद्गुरु परिवाराचे सदस्य उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्माधिकारी सदस्यांकडून मोठ्या प्रमाणात सामाजिक कामे केली जातात. ज्याठिकाणी शासन पोहचत नाही त्याठिकाणी प्रतिष्ठानाचे सदस्य पोहोचतात. श्री जगदीशप्रसाद झाबरमल टीबरेवाला विद्यापीठाने सचिनदादांच्या समाज कार्याची दखल घेऊन खर्या व्यक्तीमत्वाला पदवी बहाल केली आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.अप्पासाहेब धर्माधिकारी, कपिल पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. विनोद टीबवारेवाला यांनीही केले. यावेळी डिलीट पदवी दिल्याबद्दल सचिन धर्माधिकारी यांनी आभार व्यक्त करून परिवाराचा सामाजिक कार्याचा वसा पुढे नेण्यासाठी अशा सन्मानामुळे आणखी प्रेरणा मिळाली असल्याची भावना व्यक्त केली स्वरूपा धर्माधिकारी यांनीही मनोगत व्यक्त केले.
धर्माधिकारी परिवाराच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे सचिन धर्माधिकारी हे करीत आहेत. त्यांना या पदवीने सन्मानित करणे म्हणजे सद्गूरु परिवाराच्या प्रत्येक सदस्याचा सन्मान आहे. – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे