। सातारा । प्रतिनिधी ।
विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली असून मतदान केंद्राबाहेर चांगली गर्दी पाहायला मिळत आहे. अशातच साताऱ्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मतदान करताना एका वयोवृद्ध मतदानकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्ह्यातील खंडाळ्यातील मोरवे गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. मतदानाचा हक्क बजावतानाच शाम धायगुडे (67) अचानक चक्कर आल्याने जागेवरच कोसळले. त्यानंतर तातडीने त्यांना जवळील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.