| पनवेल | वार्ताहर |
पनवेल एस.टी.आगारात बसमध्ये चढत असणार्या 64 वर्षीय इसमाच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची चैन अज्ञात इसमाने चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. बाळाराम बैकर (64) रा.अलिबाग हे पनवेल एस.टी.स्टँण्ड येथे अलिबाग एस.टी.बसमध्ये चढत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची चेन ज्याची किंमत 80 हजार रुपये इतकी आहे. चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.