राज्यात पुन्हा अवकाळीचा इशारा

मुंबई | प्रतिनिधी |
भारतीय हवामान विभागाच्यावतीनं पुढील चार दिवसात विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील विविध ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
उत्तर भारतावरील ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव पडण्याची दाट शक्यता असल्यानं महाराष्ट्रात 6 ते 9 जानेवारी दरम्यान हलका ते मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. 8 आणि 9 जानेवारीला विदर्भातील काही जिल्ह्यांन यलो लर्ट केला आहे. महाराष्ट्रासह नवी दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि मध्य भारतात पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदूरबार आणि जळगाव या जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. तर नाशिक,अहमदनगर ठाणे आणि पालघर मध्येही पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागामध्येही पाऊस हजेरी लावू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Exit mobile version