| पिंपरी | वृत्तसंस्था |
गणेशोत्सवासाठी वर्गणी गोळा करण्यावरून पुणे जिल्हातील पिंपरी-चिखली येथे एका तरूणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. या घटणेने पुणे पुन्हा एदा हदरून गेले आहे. महेश हे रिक्षा चालक असून सहका-यांसह रोकडे वस्ती परिसरात गणपती उत्सवासाठी वर्गणी गोळा करत होते. आरोपी कोयते, काठ्या, हॉकी स्टिक व लोखंडी रॉड हातामध्ये घेऊन तिथे आले. आरोपींना पाहून परिसरातील दुकानदारांनी भीतीने दुकाने बंद केली. महेश हे सोन्या तापकीर याची रिक्षा चालवत आहेत, याचा आरोपींना राग होता. आरोपींनी ‘आमच्या परिसरात वर्गणी का गोळा करता’ असे म्हणत महेशला लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण केली. तसेच डोक्यात कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. महेशच्या खिशातील वर्गणीचे 14 हजार रुपये, त्याच्याकडील चार हजार रुपये असे 17 हजार रुपये हिसकावून घेतले. पुढील तपास चिखली पोलीस करित आहेत.