पर्यावरणपूरक शवदाहिनीपेक्षा सुसज्ज हॉस्पिटल हवे

| उरण | वार्ताहर |

उरण शहरात पर्यावरणपूरक शवदाहिनी येणार आहे. त्यामुळे वेळेची व लाकडाचीही बचत होणार आहे. परंतु, त्यापेक्षा आजच्या घडीला उरणच्या जनतेला उरणमध्ये सुसज्ज हॉस्पिलची नितांत गरज आहे. याकडे मात्र कोणताच लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष त्यांचे नेतेगण यांना लक्ष देण्यास सवड नसल्याचे उरणची जनता बोलते.

उरण नगरपालिकेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक वायुवर चालणारी शवदाहिनी शहरातील बोरी येथील स्मशानभूमीत उभारण्यात आहे. त्यासाठी एक कोटीच्या वरती खर्च अपेक्षित आहे. यामुळे वेळेबरोबर पैशांची व लाकडांची बचत होऊन प्रदूषणाला आळा बसेल. या कामाला सुरुवात झाली असून, जूनपर्यंत सुरू होईल, अशी माहिती नगरपालिका प्रशासनाने दिली.

उरणकरांना पर्यावरणपूरक शवदाहिनी गरज आहे. परंतु, त्याहीपेक्षा उरणच्या जनतेला वाढत्या औद्योगिकीकरणामुळे अपघातांचे प्रमाण वाढून वेळीच उपचार न मिळाल्याने जखमी व बळी जाणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यासाठी शवदाहिनी पर्यावरणपूरक करण्याआधी उरणकरांना सुसज्ज हॉस्पिटलची नितांत गरज आहे. कारण, वाढत्या अपघातानंतर वेळीच हॉस्पिटलमध्ये उपचार मिळाले तर अनेकांचे जीव वाचतील.

उरणकर गेली अनेक वर्षांपासून सुसज्ज हॉस्पिटलची मागणी लावून धरली आहे. त्यासाठी भूखंडही शासनाने दिला आहे. त्याला 8 ते 9 अवधी उलटूनही पुढे काहीच प्रगती झालेली दिसत नाही. याबाबत उरणमधील लोकप्रतिनिधी, सर्वच राजकीय पक्ष व त्यांचे नेते मंडळी ही स्थानिक असूनही उरणकरांना सुसज्ज हॉस्पिटल व्हावे यासाठी पाठपुरावा करण्यासाठी सवड नसल्याची खंत उरणची जनता व्यक्त करीत आहे.

Exit mobile version