कर्जतमध्ये एक खिडकी योजना कार्यन्वित

। नेरळ । प्रतिनिधी ।

मावळ लोकसभा मतदारसंघात असलेल्या 189-कर्जत विधानसभा मतदारसंघात जानेवारीपर्यंत साधारण 3 लाख 4 हजार 523 मतदार आहेत. या विधानसभा मतदारसंघात 335 मतदान केंद्र असून चार मतदान केंद्र अतिरिक्त असणार आहेत. तर 2019 मध्ये या मतदारसंघातील 1 लाख 89 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

कर्जत मतदारसंघाचे सर्व निवडणूक व्यवस्थापन कर्जत येथील प्रशासकीय भवनातून होणार असून प्रांत अधिकारी अजित नैराळे हे मावळ लोकसभा निवडणुकीचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत. त्या दृष्टीने कर्जत येथील प्रशासकीय इमारतीमध्ये निवडणुकीचे स्ट्राँग रूम तसेच अन्य कार्यलय असणार आहेत. त्यातील केंद्रीय निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केली असल्याने कर्जत विधानसभा मतदारसंघात एक खिडकी योजना सुरु करण्यात आली आहे. त्या ठिकाणी सभा परवानगी, प्रसिद्धी माध्यम परवानगी, निवडणूक हिशोब आणि खर्च यांच्यासाठी हा कक्ष उघडण्यात आला असून कर्जत तहसील कार्यालयाचे निवडणूक नायब तहसीलदार गोविंद कौटुंबे यांच्याकडे जबाबदारी आहे.

Exit mobile version