| मुंबई | प्रतिनिधी |
अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान लोकलमधून पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ऋतुजा गणेश जंगम असे या महिलेचे नाव असून ती कर्जतला राहणारी होती. ती ठाण्यातील एका खासगी कंपनीत कामाला होती. ती महिला कामावरून सुटल्यानंतर रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास लोकलमधून प्रवास करीत असताना लोकलमध्ये गर्दी असल्याने तिला दरवाज्यामध्ये उभे राहावे लागले, त्या दरम्यान तिचा हात सुटला आणि ती ट्राकवर कोसळलीने ती गंभीर जखमी झाली. या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.