| अकोला | वृत्तसंस्था |
हॉटेलमध्ये कार घुसल्याने पाणी भरत असलेल्या कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.29) रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मारुती अल्टो कार (एम-एच-32 -वाय 2465) चालकाने त्याच्या ताब्यातील कार भरधाव व निष्काळजीपणे चालवुन जुन्या बस स्थानकावरील एका हॉटेलमध्ये कार घुसवली. तेवढ्यात कार समोर पाणी भरण्यासाठी जाणारा कामगार कार खाली चिरडला गेला. सुरुवातीला त्याला स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने अकोला येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अभिजीत शिंदे (रा. भंडाराज ता. पातूर) असे मृतकाचे नाव आहे. पोलीस वेळेत पोहोचू शकले नसल्याने चालक फरार झाला. मात्र, अपघातातील मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कारचालकास घटनेनंतर काही नागरिकांनी पकडून ठेवले होते. या प्रकरणी चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.