आंबेडकरांचे पोस्टर लावणार्‍या युवकाचा मारहाणीत मृत्यू


जयपूर | वृत्तसंस्था |
राजस्थानच्या हनुमानगढ जिल्ह्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं पोस्टर लावल्याप्रकरणी जमावाने तरुणाला मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला आणि काही वेळातच त्याने प्राण सोडले. याबाबत पोलिसांनी अधिक तपास करत माहिती घेतली.

गेल्या काही दिवसांपूर्वी राजस्थानच्या हनुमानगढ जिल्ह्यामधल्या एका गावामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं पोस्टर प्रकरणी सुरु असलेल्या वादाने चांगलाच पेट घेतला. त्यामुळे ओबीसी समाजाच्या काही जणांनी या दलित युवकाला अमानुष मारहाण केल्याचं वृत्त आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या या 21 वर्षीय युवकाने प्राण सोडले.

हनुमानगढच्या किकरालिया गावाचा रहिवासी असलेला विनोद बामनिया हा भीम आर्मीचा सदस्य होता. त्याच्यावर 5 जून रोजी ओबीसी समाजाच्या काही लोकांनी हल्ला केला. ज्यात तो गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर विनोदला जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र दोन दिवसांतच त्याचं निधन झालं.

Exit mobile version