मोटरसायकलची कंटेनरच्या धडकेने, तरुणाचा मृत्यू

| पनवेल | वार्ताहर |

मोटरसायकल हयगईने व बेदरकारपणे चालवून पुढे जाणाऱ्या कंटेनरला पाठीमागून धडक दिल्याने यात 25 वर्षीय सोनू अभय दास (सेक्टर 10 खारघर, कोपरा) याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कळंबोली पोलीस अधिक तपास करत आहेत.

सोनू अभय दास हा क्रशर मशीनच्या पट्ट्याचे मेंटेनन्स करण्याचं काम करतो. 3 फेब्रुवारी रोजी रात्री कामावरून सोनू अभय दास खारघर येथे घरी जात असताना पडघा ब्रिजवर तळोजा येथून खारघर येथे होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल क्रमांक एम एच 46 बी एन 9544 यावरून जात होता. रात्री साडे दहा ते अकराच्या दरम्यान कंटेनरला पाठीमागे स्वतःच्या मोटरसायकलने जाऊन धडक दिली. यात त्याच्या डोक्याला जखमा झाल्या. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 9 फेब्रुवारी रोजी त्याचा मृत्यू झाला.

Exit mobile version