। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल परिसरातील खारघर येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. खारघर येथील हिरानंदानी ब्रीजपासून 400 मीटर अंतरावर डिलेव्हरी बॉय सुजितकुमार वर्मा हा त्याच्याकडील इलेक्ट्रीक बाईकवरुन डिलेव्हरी देण्यासाठी जात होता. त्यावेळी डावीकडून येणाऱ्या भरधाव टँकरने त्याच्या बाईकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तो गंभीररित्या जखमी होऊन मयत झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत खारघर जवळील कोपरा बस स्टॉप समोरुन रस्ता ओलांडत असलेल्या रबीश दास या पादचाऱ्याला अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.







