। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यभरात अनेक ठिकाणी मोठमोठ्या दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात अनेक गोविंदा पथक आणि हजारो गोविंदा हजर झाले आहेत. सकाळपासून दहीहंडीचा उत्साह बघायला मिळत आहे. मात्र, या उत्साहाला गालबोट लागणारी एक दुर्देवी घटना मानखुर्दमध्ये घडली आहे. या दुर्घटनेत बाल गोविंदा पथकातील 32 वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाला आहे.
ही दुर्घटना मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरमध्ये दुपारी 3 च्या सुमारास घडली आहे. बाल गोविंदा पथक तिथे दाखल झालं होतं. 32 वर्षीय जगमोहन चौधरी याला दहीहंडीचा रोप बांधला जात होता. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. जगमोहन चौधरी दोर बांधत असताना खाली पडला आणि या दुर्दैवी घटनेत त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जगमोहनला त्याच्या नेतावाईकांनी तातडीने गोवंडी येथील शताब्धी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यामुळे मानखुर्दमध्ये शोककळा पसरली आहे.
दरम्यान, मुंबईमध्ये विविध ठिकाणी दहीहंडी फोडताना थरावरून पडल्याने 30 जण जखमी झाले आहेत. यातील 15 जणांना उपचार करून घरी पाठवण्यात आले, तर 15 गोविंदांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.







