रानबाजिरे गावातील सावित्री नदी पात्रात तरुणाचा बुडून मृत्यू

| पोलादपूर | शैलेश पालकर |

कापडे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील रानबाजिरे गावातील सोनारवाडीतील एका तरूणाचा सावित्री नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रानबाजिरे गावातील सोनारवाडीतील रहिवासी गणेश एकनाथ पारकर हा तरूण सोमवारी (दि.6) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यापलिकडील सावित्री नदी पात्रात पोहोण्यासाठी उतरला. मात्र, पोहताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. या घटनेनंतर त्याचा शोध घेतल्यानंतर मृतदेह नदीपात्रात आढळून आल्याने त्याबाबत योगेश पारकर यांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी सहायक पोलीस निरिक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.काँ. कदम अधिक तपास करीत असून, शवविच्छेदनावेळी गणेश एकनाथ पारकर याचा पाण्यात बुडाल्यानंतर श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.

Exit mobile version