| अलिबाग | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील कळवे येथील तीनबत्ती नाका परिसरात गणपती विसर्जन सुरू असताना वादातून मारहाणीचा प्रकार घडला. गावातील मोरया मित्र मंडळाचा विसर्जन सोहळा पाहण्यासाठी गेलेल्या फिर्यादीला आरोपीने शिवीगाळ करून हाताबुक्क्यांनी मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या भावाजवळ आरोपीने निष्काळजीपणे फटाका फोडल्याने तो फटाका अंगावर उडून उजव्या डोळ्याला लागला. यात साक्षीदारास दुखापत झाली असून, दादर सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अपर्णा पाटील करीत आहेत.






