मासे पकडण्यासाठी गेलेल्या युवकाचा खाडीत बुडून मृत्यू

। उरण । वार्ताहर ।
मासे पकडण्यासाठी गेलेल्या युवकाचा खाडीत बुडून होण्याची घटना खोपटे खाडीजवळ घडली. पाच तरुण मौजमजा करण्यासाठी तसेच मासे पकडण्यासाठी गेले होते. पार्टी संपल्या नंतर खोपटे खाडीतील छोट्या होडी ने फिरण्याचा मोह झाला ते होडीत बसून ते मनसोक्तपणे फिरत असतानाच होडीचा तोल बिघडला. समुद्राचे पाणी होडीत शिरू लागलं आणि अचानक ती होडी पलटी झाली आणि ते पाचही मित्र पाण्यात पडले. त्यातील स्वप्निल चंद्रकांत पाटील,( वय 28 रा,पागोटे हा सुद्धा आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होता.परंतु पोहता पोहता त्याला दम लागला. तो आपल्या मित्रांना आवाज देत होता पण त्याचा आवाज मित्रांपर्यत पोचला नाही आणि क्षणार्धात स्वप्नीलचा त्या घटनास्थळी मृत्यू झाला.

विजय रामकृष्ण पाटील (पागोटे ), शुभम नरेश पाटील (पागोटे ), महेश जगनाथ म्हात्रे (खोपटे ), राकेश बाळाराम अहिरे (शिरवणे, नेरुळ, नवी मुंबई ), अशी अन्य मित्रांची नावे आहेत. मृत्यूची नोंद उरण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिरुद्ध गिजे करीत आहेत.

Exit mobile version