| पनवेल | वार्ताहर |
कोणत्या तरी अज्ञात कारणाने एका 25 वर्षीय तरुणीने फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे. कांचन कश्यप असे मयत तरुणीचे नाव असून, तिने करंजाडे येथील तिच्या राहते घरामध्ये कोणत्या तरी अज्ञात कारणाने फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.






