| नवीन पनवेल | वार्ताहर |
भाताण येथील अमेठी युनिव्हर्सिटी मध्ये शिक्षण घेत असलेल्या 21 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी कार्तिकेय याच्या विरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित तरुणी सेमिनार हॉलमध्ये खुर्चीवर बसलेले होती. तिच्या मागे बसलेला कार्तिकेय याने तिचा विनयभंग केला. या प्रकरणी पीडित तरुणी तिच्या वडिलांसह पनवेल तालुका पोलीस ठाण्यात आल्यानंतर आरोपी कार्तिकेय याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.