किराणा दुकानात चोरी करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ बाजारपेठ भागातील एका किराणा दुकानात एक तरुण चोरी करीत असल्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते. संबंधित प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल नसताना देखील गुप्तचर विभाग यांच्या कर्मचार्‍यांच्या सतर्कता यामुळे त्या तरुणाला चोरलेल्या किरकोळ वस्तुंसह ताब्यात घेण्यात यश आले आहे. नेरळ पोलिसांनी कोणतीही तक्रार दाखल नसताना केलेली कारवाई याबद्दल नेरळ पोलिसांचे कौतुक होत आहे.

नेरळ बाजारपेठमधील एका छोट्या किराणा मालाच्या दुकानात एक मुलगा खरेदी करण्याचे बहाण्याने चोरी करत आहे. तसा व्हिडीओ नेरळ आणि कर्जत परिसरातील समाज माध्यम यांच्यावर व्हायरल झाला होता. परंतु कमी रक्कम चोरी गेलेली असल्याने दुकानदार यांनी तक्रार दिली नव्हती. नेरळ पोलीस स्टेशन मधील गुप्तचर विभागाचे कर्मचारी यांनी नेरळ बाजारपेठमध्ये गस्त घालून त्यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यानंतर फिर्यादी यांना बोलवून गुन्हा दाखल केला. आरोपीत हा विधीसंघर्षित बालक असून तो खोपोली येथील राहणारा आहे. आरोपीकडून गुन्ह्यातील चोरी केलेली सर्व रक्कम हस्तगत झाली आहे. पुढील कार्यवाही नेरळ पोलीस करीत आहेत.

Exit mobile version