मुरुड येथे आधारकार्ड लिंक कार्यक्रम

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मतदार यादीतील नोंदणीकृत मतदारांच्या मतदार ओळखपत्राशी आधार क्रमांक लिंक करण्याचा राष्ट्रव्यापी कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची ओळख व प्रसार करण्यासाठी मतदारांचा जनजागृतीपर कार्यक्रम मुरुड तालुक्यातील सर्व मतदारांसाठी शुक्रवार, दि.५ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता वसंतराव नाईक महाविद्यालय मुरुड-जंजिरा येथे व सकाळी 11 वाजता अंजुमन इस्लाम डिग्री कॉलेज ऑफ सायन्स मुरुड-जंजिरा येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास सर्व नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थिती नोंदवून सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार मुरुड रोहन शिंदे, निवडणूक नायब तहसीलदार अमित पुरी यांनी केले आहे

Exit mobile version