| उरण | प्रतिनिधी |
उरण विभागात सतत होत असलेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबासाठी तसेच दुखापत झालेल्या सीएचए बांधवांसाठी अपघातग्रस्त निधी संकलनासाठी त्याचप्रमाणे विविध सामाजिक कार्य करण्याच्या उद्देशाने मी मराठी मैदान मोठी जुई, उरण येथे सीएचए आधार चषकाचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला रसिक प्रेषक, तरुण वर्गांचा मोठा उत्तम प्रतिसाद लाभला.
दरवर्षी सीएचए आधार चषक या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाते व स्पर्धेतील मिळणारी रक्कम अपघातग्रस्तांसाठी व सामाजिक कार्यासाठी वापरली जाते. अशा या सीएचए आधार चषकासाठी नागरिकांनी, रसिक प्रेक्षकांनी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या स्पर्धेला भेट देऊन सदर स्पर्धेचे व संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी न्हावा शेवा सीएचए आधार सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मानकरी संघ रॉकस्टार मोठीजूई ठरला तर द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ द्विज इलेव्हन पाले ठरला आहे. या संघावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आधार चषक स्पर्धा उत्साहात संपन्न
