। अलिबाग । प्रतिनिधी ।
महाविकास आघाडी पुरस्कृत शेकाप उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई अलिबा, मुरुड, रोहा विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत उभ्या राहिल्या आहेत. आम आदमी पार्टीच्यावतीने त्यांना पाठींबा देण्यात आला. शेतकरी भवन येथे बुधवारी (दि.6) चित्रलेखा पाटील यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र देण्यात आले.
यावेळी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, महाविकास आघाडी पुरस्कृत शेकाप उमेदवार चित्रलेखा पाटील, महाराष्ट्र संघटन मंत्री डॉ. रियाज पठाण, माजी जिल्हा अध्यक्ष मनोज घरत, पनवेल विधानसभा समन्वयक जयसिंग शेरे आदी पदाधिकारी, नृपाल पाटील, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, अवधुत पाटील, मोहन धुमाळ, नागेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.