‘आप’चा सुधाकर घारेंना पाठिंबा

| नेरळ | प्रतिनिधी |

सुधाकर घारे हे दमदार उमेदवार असून, त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे. चौक सुशोभिकरण हा विकास नसून, तरुणांच्या हाताला काम आणि मतदारसंघातील जनता आनंदाने राहिली पाहिजे यासाठी योग्य उमेदवार म्हणून सुधाकर घारे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय आम आदमी पार्टीने घेतला. दरम्यान, महाराष्ट्रात आम आदमी पक्ष इंडिया आघाडीचा घटक पक्ष असून, महाविकास आघाडीचा घटक पक्ष नाही, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री अ‍ॅड. रियाझ खान यांनी दिली.

कर्जत विधानसभा मतदारसंघातील परिवर्तन आघाडीचे उमेदवार सुधाकर घारे यांना आम आदमी पक्षाचे पाठिंबा देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी महारष्ट्र राज्य संघटन मंत्री अ‍ॅड. रियाझ पठाण खान, खालापूर तालुका सचिव चंद्रप्रकाश उपाध्याय, खोपोली शहर अध्यक्ष विवेक वाघमारे उपस्थित होते. यावेळी अपक्ष उमेदवार सुधाकर घारे परिवर्तन विकास आघाडीला पाठिंबा देऊन आमच्या आघाडीला ताकद देण्याचे काम केले आहे. योग्य उमेदवार ओळखून त्यांनी पाठिंबा दिला आहे आणि त्यामुळे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा विश्‍वास व्यक्त केला. त्याचवेळी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर कोणतेही प्रसंग आल्यास त्या त्या वेळी मदतीसाठी आघाडीवर असेल, असे आश्‍वासन सुधाकर घारे यांनी दिले.

Exit mobile version