। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांना आम आदमी पार्टीने जाहीर पाठिंबा दिला आहे. बाळाराम पाटील यांना विविध पक्षांचा पाठिंबा मिळत असल्याने त्यांची ताकद वाढली आहे. त्यांच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. यातच आता महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक रायगड जिल्ह्याकरता महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला आम आदमी पार्टीने बिनशर्त पाठिंबा दिला असल्याचे पत्र महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटन मंत्री डॉ. रियाझ पठाण यांनी दिला आहे. यावेळी समन्वक अॅड. जयसिंग जगन्नाथ शेरे, संघटन मंत्री चिमाजी शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.