। खांदेश्वर । प्रतिनिधी ।
मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज 18 वर्षे पूर्ण होत आहेत. या हल्ल्यात देशाचे संरक्षण करताना प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलीस अधिकारी आणि जवानांना खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
26 नोव्हेंबर हा दिवस भारतीयांच्या मनात दहशतवादाविरोधातील संघर्षाची आणि देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीरांच्या शौर्याची आठवण करून देणारा आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांसह पोलीस अधिकारी आणि जवानांना आपले प्राण गमवावे लागले होते. दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, तुकाराम ओंबळे यांच्यासह सर्व शूरवीरांच्या बलिदानाचे स्मरण यावेळी करण्यात आले. खांदेश्वर पोलीस ठाण्यात आयोजित अभिवादन कार्यक्रमात शहीद पोलीस बांधवांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यात आली.






