पंजाबमध्ये आप, उत्तराखंड, उप्रमध्ये भाजप

निवडणुकीची रणधुमाळी संपली
आता उत्सुकता मतमोजणीची

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

उत्तर प्रदेशमध्ये सोमवारी अखेरच्या सातव्या टप्प्याचे मतदान संपले आणि गेले महिनाभर सुरु असलेली मतदानाची रणधुमाळी संपुष्टात आली. आता सार्‍यांनाच उत्सुकता लागली आहे ती 10 मार्चला होणार्‍या मतमोजणीची. सातव्या टप्प्याचे मतदान संपताच अनेक टीव्ही चॅनेल्सवरुन एक्झीट पोल सुरु करण्यात आले.त्यात उत्तरप्रदेशात भाजप, उत्तराखंडमध्ये काँग्रेस सत्तेवर येईल, असा दावा करण्यात आला आहे. तर गोव्यात सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचा दावा या एक्झीट पोलद्वारे करण्यात आला आहे. तर पंजाबमध्ये आपची लाट असल्याचे सुचित करण्यात आलेले आहे.

उत्तराखंडमध्ये भाजपला 37, काँग्रेसला 31 आणि आम आदमी पक्षाला एका जागेवर विजय मिळण्याचा अंदाज आहे. गोव्यात भाजपला 6 ते 22 जागा तर काँग्रेसला 11 ते 17 जागांवर विजय मिळण्याची शक्यता पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला 76 ते 90 जागांवर विजयी होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात भाजपला जवळपास 277 जागा तर सपाला 134 जागा मिळतील असा अंदाज आहे.

Exit mobile version