| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
गोवा,पंजाब,उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी सोमवारी प्रचंड उत्साहात मतदान झाले.उत्तरप्रदेशातही दुसर्या टप्प्याचे मतदान पार पडले.एकूण 282 जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली.आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती 10 मार्चला होणार्या मतमोजणीची. गोव्यात 40 , उत्तराखंडमध्ये 70,पंजाब 117 तर उत्तर प्रदेशमध्ये दुसर्या टप्प्यातील 55 जागांसाठी मतदान झाले.प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 65 ते 70 टक्के मतदान झाल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.मतदानाच्या पार्श्वभूमीवर सर्वच मतदान केंद्रांवर कडक सुरक्षा तैनात करण्यात आली होती.किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता अन्यत्र कुठेही तणावात्मक घटना घडली नाही.