आराध्य पाटील उत्कृष्ट बालकलाकार

‘सुखी सदर्‍याचा शोध’ मधील अभिनयासाठी पारितोषिक

| अलिबाग । वार्ताहर ।

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित 19वी राज्य स्तरीय बालनाट्य स्पर्धा 2022-23 प्राथमिक फेरी साहित्य मंदिर सभागृह वाशी, नवी मुंबई येथे पार पडली. स्पर्धेत एकूण 32 बालनाटके सादर केली. यामध्ये अनंत सांस्कृतिक कलामंच पेझारी-अलिबाग या संस्थेच्या सुखी सदर्‍याचा शोध या बालनाट्यातील आराध्य पाटील याला अभिनयाचे बक्षिस जाहीर झाले.

या नाटकातील सर्व बालकलाकारांनी उत्कृष्ट अभिनय, नृत्य करून प्रेक्षकांची दाद मिळवली. या नाटकाचे लेखन उदय गोडबोले यांनी केले असून राजन पांचाळ यांनी बालनाट्याचे उत्कृष्टरीत्या दिग्दर्शन केले आहे. या नाटकातील गाणी अप्रतिम झाली आहेत. ती राजेंद्र म्हात्रे यांनी संगीतबद्ध केली आहेत. नेपथ्य प्रमोद पाटील, देवेंद्र पाटील यांनी नाटकाला साजेसेच केले होत. देवेंद्र पाटील यांची रंगभुुषा जबरदस्त होती. अमोल कापसे यांनी नृत्य अप्रतिम बसवली होती. रंजन जाधव यांचे पार्श्‍वसंगीत खुपच छान. मिलन पाटील यांची प्रकाश योजना नाटकाला साजेसी केली. वेेशभुषा रश्मी पांचाळ यांची होती. नाटकाला मिळालेल्या यशाबद्दल खारेपाट विभागातून कौतुकाचा वर्षांव होत आहे.

निर्माता सौरभ आपटे, निर्मिती सहाय्य निनाद पाटील, सूत्रधार देवेंद्र केळूसकर, दिग्दर्शन सहाय्य प्रतिक पानकर, जुईली टेमकर आणि रंजना पाटील, गायिका पूजा पाटील, वेदांती पाटील, श्रुती पाटील तनया म्हात्रे, कार्तिकी पाटील, सिंंथेेसायझर शार्दूल भगत, ढोलक वेदांत म्हात्रे, तबला दिप हुजरे, व्यवस्थापन सुरेंद्र टेमकर, मारुती बैकर, ध्वनीमुद्रण वरुण भगत, माऊली स्टुडिओ पेझारी-अलिबाग.

कलाकार आराध्य पाटील, भाग्येश निकम, गौरी म्हात्रे, मंथन पाटील, रिद्धी पिंगळे, जीत म्हात्रे, ओम पाटील, चिराग पाटील, विधी जांभळे, गार्गी पाटील, दिक्षा पाटील, भक्ती साखरे, कनक पाटील, अंश ठाकूर, मुद्रा पाटील, विरा नरबेकर यांनी उत्कृष्ट काम केली आहेत. माजी आ. पंडित पाटील, माजी जिप सदस्या चित्रा पाटील, विक्रांत वार्डे, देवेंद्र केळूसकर, श्री फडतरे, राजन पांचाळ यांनी बालकलाकारांनी मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन केले.

Exit mobile version