आराध्यचे ओलिंपियाडमध्ये यश

। चिरनेर । प्रतिनिधी ।

आजकाल शिक्षण क्षेत्रामध्ये सगळ्या स्तरांमध्ये स्पर्धेची रस्सीखेच चालू असून, सन 2023-24 मध्ये झालेल्या ओलिंपियाड परिक्षेत भारतातील 25 राज्यातील 750 शाळांनी भाग घेतला होता. या परीक्षेत लाखो विद्यार्थी आपले नशीब आजमावत होते. त्यातूनच उरण तालुक्यातील सेंट मेरी शाळेतील इयत्ता तिसरीमधील आराध्य मयुरेश पाटील या प्रतिभाशाली विद्यार्थ्याने राष्ट्रीय स्तरावर रिझनींग विषयात प्रथम स्थान प्राप्त केले आहे. त्या निमित्त त्याला शाळेकडून प्रशस्तीपत्रक, ट्रॉफी व सुवर्णपदक मुख्याध्यापिका व शिक्षकांच्या हस्ते सन्मानपूर्वक देऊन सत्कार करण्यात आला. आठ वर्षाच्या आराध्यचे ज्ञान, परिश्रम व निष्ठा पाहून त्याचे उरण तालुक्यातून सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मात्र, आराध्यचे परिश्रम, त्याच्या कुटुंबियांचे प्रयत्न तसेच सेंटमेरी स्कूल उरण शिक्षकांचे मागदर्शन लाभल्याने शिक्षकांचेसुद्धा अभिनंदन केले जात आहे.

Exit mobile version