| रायगड | प्रतिनिधी |
जलतरणाच्या तलावात आपल्या कौशल्याचा ठसा उमटवत आरती दळवी हिने थेट आशियाई स्तरावर रायगडचा झेंडा उंचावला आहे. बेंगळुरू येथे पार पडलेल्या दुसऱ्या आशियाई मास्टर स्विमिंग स्पर्धेत आरतीने तब्बल सहा सुवर्णपदके आणि एका रौप्यपदकाची कमाई केली. तिच्या या चमकदार यशाने रायगड जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. आपल्या लाडक्या कन्येच्या या ऐतिहासिक कामगिरीचा आनंद साजरा करण्यासाठी गोरेगावकरांनी तिचे जंगी स्वागत केले.
बेंगळुरू येथे पार पडलेल्या दुसऱ्या आशियाई मास्टर स्विमिंग स्पर्धेत आरतीने एक-दोन नव्हे, तर तब्बल सहा सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले आहे. यासोबतच एका रौप्यपदकाची कमाई करत तिने आपल्या उत्कृष्ट जलतरण कौशल्याची ताकद सिद्ध केली. आशियाई स्तरावरील स्पर्धेत अशी उल्लेखनीय कामगिरी करणे ही केवळ एका खेळाडूची वैयक्तिक उपलब्धी नाही, तर संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. आरतीच्या या यशामुळं गोरेगावचे नाव क्रीडा क्षेत्रात उजळले असून, तिच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत आहे.
आरतीने सहा सुवर्णपदकांवर कोरले नाव
