आ. जयंत पाटील यांची प्रमुखु उपस्थिती
। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव तालुक्यातील मोर्बा जिल्हा परिषद गटात शेकाप पक्षाच्या रायगड जिल्हा परिषद सदस्या आरती मोरे यांनी आपला विकासकामांचा धडाका सुरूच ठेवला आहे. गेल्या पाच वर्षात त्यांनी मोर्बा जिल्हा परिषद गटात विविध गावांमध्ये पाच कोटी रुपयांपेक्षा अधिकतम विकासकामे केली असून यांपैकी बरीचशी कामे मार्गी लागली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. या विकासकामांपैकी मोर्बा जिल्हा परिषद गटातील काही गावातील विकासकामांचा भूमिपूजन व उदघाटन सोहळा कार्यक्रम शनिवार दि.14 मे 2022 रोजी आयोजित केला आहे.
सदर कार्यक्रमासाठी आ.जयंत पाटील, माजी आ. पंडित पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस अँड.आस्वाद पाटील,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया पाटील, महिला ाघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, रायगड जिल्हा परिषद सदस्या चित्रा पाटील, आर.डी.सी.सी.बँकेचे संचालक अस्लम राऊत,रायगड जिल्हा परिषद सदस्या आरती मोरे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमास राजिपचे माजी समाजकल्याण सभापती अशोक गायकवाड, कृउबा समिती सभापती माणगाव संजय पंदेरे,मोर्बा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विलास गोठल, उपसरपंच हसनमिया बंदरकर,महेश सुर्वे,विजय आंब्रे,नरेश दळवी,निजाम फोपळूणकर, विलास मोरे, राजेश कासारे,दिनेश गुगुळे,जेष्ठ नेते भागोजीबुवा डवले,गोविंद पवार,नथुराम आडीत,नितीन वाघमारे,वैभव डवले,विरेन मेथा,अमोल मोहिते,संजय गायकवाड,दिलीप उतेकर यांच्यासह मुंबईकर मंडळ आदी उपस्थित राहणार आहेत.तरी या कार्यक्रमास मोर्बा जिल्हा परिषद गटातील पक्षाचे प्रमुख सर्व कार्यकर्ते तसेच तालुक्यातील कार्यकर्त्यांनी, विभागातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी करून या कार्यक्रमाची जोरदार तयारी माणगाव तालुका शेतकरी कामगार पक्षातर्फे करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
यादिवशी सकाळी 10:30 वाजता मौजे न्हावे येथे बगाडाचे लोकार्पण,सकाळी 11:30 वाजता मौजे कुमशेत येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व उदघाटन,दुपारी 12 वाजता मौजे पळसप येथे डांबरीकरण रस्ता व सभागृहाचे उदघाटन,दुपारी 12:30 वाजता मौजे रानवडे येथे नळ योजना,सभामंडप लादी,शाळा दुरुस्ती,स्मशानभूमीकडे जाणारा अंतर्गत रस्ता,बोरवेल इ.उदघाटन व भूमिपूजन,दुपारी 1 वाजता गोवेले मानसई वाडी येथील रस्त्याचे डांबरीकरण व शाळा दुरुस्ती उदघाटन,दुपारी 1:30 वाजता चांदोरे कुणबी आळी सभागृह भूमिपूजन,दुपारी 2 वाजता मौजे कातळाची नळेफोडी येथे गणेश मंदिर,अंगणवाडी,साकव इ.कामाचे भूमिपूजन, दुपारी 3 वाजता निवाची नळेफोडी येथे डांबरीकरण रस्ता व सभामंडप तसेच शाळा दुरुस्ती उदघाटन,सायंकाळी 4 वाजता मौजे नाईटने येथे नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन आदी कामांचा शुभारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याचे तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.







