अबब! मुरूडच्या समुद्र किनार्‍यावर आढळले 45 किलोचे लॉगहेड कासव

। मुरूड । संतोष रांजणकर ।
मुरूड समुद्र किनारी शुक्रवारी (दि.20) सकाळी मृत अवस्थेतील महाकाय लॉगहेड कासव आढळून आले. हे कासव दुर्मिळ लॉगहेड प्रजातीतील असुन याची लांबी सुमारे 3.5 फुट आहे तर या कासवाचे वजन 45 किलो होते. हे कासव 8 दिवसांपूर्वी मृत झाले असावे, असे सर्पमित्र संदीप घरत यांनी सांगितले. हे कासव खुप कुजलेले असल्याने याच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही.


शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे मुरुड समुद्र किनारी विनोद अंबुकर घोडागाडी चालक व्यवसाय करण्यासाठी गेले होते. त्यावेळी समुद्रकिनारी पाण्यात हे कासव वाहून आलेले दिसले. ते कुजलेले असल्याने दुर्गंधी येत होती. त्यावेळी सर्पमित्र संदिप घरत यांना हि वार्ता कळविण्यात आली. संदिप घरत यांनी तातडीने वनखात्याला बोलावू त्याला समुद्र किनारी पुरून टाकले. गेल्याच महिन्यात 10 एप्रिल रोजी याच ठिकाणी 30 ते 35 किलो वजनाचे याच जातीचे कासव मृत अवस्थेत आढळून आले होते. त्या नंतर याच महिन्यात 2 मे रोजी खोरा बंदरात लॉगहेड जातीचे मादी कासव जिवंत स्वरुपात आढळून आले होते.

Exit mobile version