सर्पमित्र संदीप घरत यांनी सुखरूप समुद्रात सोडले
। मुरूड । प्रतिनिधी ।
मुरुड समुद्रकिनारी सर्पमित्र संदीप घरत यांना जिवंत लॉगहेड जातीचे कासव सापडले. हे कासव पंधरा किलो वजनाचे होते. सर्पमित्र घरत यांनी तातडीने वनखात्याला संपर्क करुन बोलावून घेतले. तसेच वन खात्याच्या मदतीने कासवाला पुन्हा सुखरूप समुद्रात सोडून दिले.
