| उरण | वार्ताहर |
सोनारी येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. मुलीच्या आईने या संदर्भातील तक्रार न्हावा शेवा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. तर पोलिसांनी कलम 363 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून मुलीचा शोध सुरु केला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनारी गावामध्ये राहणारी 17 वर्षीय युवती वाजेकर विद्यालयात शिकत आहे. सदर मूलीला 21 जानेवारी सकाळी 7 ते 7-30 या वेळेत अज्ञातने फूस लावून पळवून नेल्याची माहिती मुलीची आई रेखा सजन गावडे यांनी पोलिसांना दिली आहे. ज्या वेळेस मुलीला पळवून नेले त्या वेळेस मुलीच्या अंगावर नारंगी रंगाचा टॉप आणि पांढर्या रंगाची पॅन्ट, पायात गुलाबी रंगाचे सँडल आणि हातामध्ये काळ्या रंगाची स्कूल बॅग आहे. सावला रंग, सरळ केस, लांब नाक, उंची 4 फूट 10 इंच, सडपातळ बांधा असे या मुलीचे वर्णन असून अशा वर्णनाची मुलगी आढळून आल्यास न्हावा शेवा पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.