सिडको महागृहनिर्माण योजनेच्या अर्जदारांसाठी अभय योजना

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

सिडको महामंडळाने महागृहनिर्माण योजने अंतर्गत अर्जदारांकडून वारंवार मुदतवाढीसाठी विनंती करण्यात येत असल्याने, सिडको संचालक मंडळाने या बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन, सदर अर्जदारांना अंतिम संधी म्हणून दि. 30 एप्रिलपर्यंत हप्त्यापोटी शिल्लक रक्कमेचा भरणा करण्याकरीता विलंब शुल्कात सवलत देण्याबाबतची अभय योजना आणण्यास मान्यता दिलेली आहे.

सिडको महागृहनिर्माण योजनांतील सदनिकेचे हप्ते न भरलेल्या अर्जदारांकरिता सिडकोतर्फे अभय योजना सादर करण्यात येत आहे. अभय योजनेंतर्गत विहित मुदतीत हप्त्यांचा भरणा करणार्‍या अर्जदारांना विलंब शुल्कात सवलत मिळणार आहे. सर्वसामान्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या सिडकोने अर्जदार हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटातील आहेत या बाबीचा विचार करून, त्यांचे घराचे स्वप्न कुठल्याही परिस्थितीत पूर्ण व्हावे, याकरिता अभय योजनेच्या रूपाने त्यांच्यावरील आर्थिक भार कमी करण्याचा निर्णय घेऊन त्यांना दिलासा दिला आहे. तरी अधिकाधिक अर्जदारांना अभय योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन उपाध्यक्ष डॉ. संजय मुखर्जी यांनी केली आहे.

योजनेतील थकबाकीदार अर्जदारांना सुचित करण्यात येते की, सिडको महामंडळाच्या अधिकृत www.cidco.maharashtra.gov.in संकेतस्थळावर भेट देऊन आपल्या शिल्लक हप्त्यापोटी संपूर्ण रक्कमेचा भरणा विहीत मुदतीत करण्यात यावा व या अभय योजनेचा सर्व अर्जदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकोकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version