। नवी मुंबई । वार्ताहर ।
सिडको महामंडळाकडून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत साकारण्यात येत असलेल्या महागृहनिर्माण योजनेसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून पाच हजार रूपये कोटींचा पतपुरवठा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे सदर महागृहनिर्माण योजनेंतर्गत सुरू असणार्या घरांच्या बांधकामास गती मिळून सर्वसामान्यांचे परवडणार्या दरातील हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे.
नवी मुंबईतील विविध नोड्समध्ये सिडकोतर्फे राबवण्यात येणारी ही महागृहनिर्माण योजना ङ्गपरिवहन केंद्रीत विकासफ या संकल्पनेवर आधारित आहे ज्यात 1 लाख्स 12 हजार 500 सदनिकांचा समावेश आहे. यातील प्रथम टप्प्यामध्ये 23 हजार 500, द्वितिय टप्प्यामध्ये 67 हजार आणि तृतिय टप्प्यामध्ये आणखी 22 हजार सदनिकांचा समावेश आहे. यापैकी 35 टक्के सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटांसाठी आहेत तर 15 टक्के सदनिका अल्प उत्पन्न गटांसाठी व उर्वरित सदनिका खुल्या घटकासाठी विक्रीसाठी उपलब्ध असतील. जागांची उपलब्धता, आर्थिक नियोजन, वैधानिक परवानग्या, प्रकल्प संनियंत्रण यंत्रणा, या सर्व आघाड्यांवर यशस्वीपणे काम करून सिडकोने महागृहनिर्माण योजनेची अंमलबजावणी करण्यास प्रारंभ केला. या महागृहनिर्माण योजनेतील टप्पा-1 मधील घरांचे बांधकाम पूर्ण झाले असून टप्पा-2 मधील घरांचे बांधकामही वेगाने सुरू आहे. योजनेच्या टप्पा-3 मधील घरांच्या बांधकामासही लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.
स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडून मंजूर करण्यात आलेल्या पतपुरवठ्यामुळे महागृहनिर्माण योजनेचे काम नियोजित वेळेत पूर्ण करणे शक्य होणार आहे. या महागृहनिर्माण योजनेस 6% व्याज दराने पतपुरवठा मंजूर करण्यात आला असून एखाद्या सार्वजनिक उपक्रम संस्थेस इतक्या कमी व्याज दराने पतपुरवठा मिळणे ही अतिशय दुर्मिळ बाब आहे. सदर महागृहनिर्माण योजना आपल्या देशातील व जगातील सर्वात मोठी गृहनिर्माण योजना ठरेल यात शंका नाही.
डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको