ब्लॅक बेल्ट स्पर्धेत अभिजित कलमकरने मिळवली पदवी

| म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा शहरातील कुंभार आळीतील अभिजित अभय कळमकर याने महाड येथे संपन्न झालेल्या कराटे ब्लॅक बेल्ट स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून अव्वल स्थान पटकावूून पदवी प्राप्त केली आहे. महाड येथे आयोजित ब्लॅकबेल्ट स्पर्धेत म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर तालुक्यातील अभिजित कळमकर, विक्रांत खांडेकर, सिद्धी सावंत, सृतिक वाणी, धनश्री तोडणकर आणि आर्यन या सहा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत अभिजित याने उत्कृष्ट कामगिरी करून पदवी मिळवली. अभिजीतने वेळोवेळी आयोजित शालेय, तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेऊन चांगली कामगिरी करून पदक प्राप्त केले आहेत. हे यश प्राप्त करण्यासाठी त्याची आई अपेक्षा कळमकर माजी सरपंच, वडील अभय कळमकर कुंभार समाज युवक अध्यक्ष, समाज अध्यक्ष सुनिल अंजार्लेकर, सचिव संतोष कुडेकर, सल्लागार सुरेश कुडेकर आणि समस्त कुंभार समाज ज्ञाती बंधुभगिनींचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे.

Exit mobile version