| कोलाड | प्रतिनिधी |
कोलाड क्रिकेट असोसिएशनच्या या वर्षातील 14 व्या पर्वानिमित्त आयोजित सभेत कार्याध्यक्षपदी राहुल शिंदे यांची निवड करण्यात आली. प्रेरणा हॉटेल येथे ही सभा उत्साहात पार पडली. या निवडीनंतर रायगड जिल्हा युवक अध्यक्ष राकेश शिंदे यांच्या कार्यालयात आमदार अनिकेततटकरे यांनी नवनियुक्त कार्याध्यक्ष, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह संपूर्ण असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे तसेच क्रिकेटप्रेमींचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी आमदार अनिकेत तटकरे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देताना, क्रिकेटच्या विकासासाठी तुम्ही पुढाकार घ्या, तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे, असा विश्वास व्यक्त केला. त्यांच्या या आश्वासक भूमिकेमुळे उपस्थित पदाधिकारी आणि क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कोलाड क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील क्रिकेट खेळाला प्रोत्साहन देण्याचे काम सुरू आहे. यंदा असोसिएशनचे 14 वे पर्व असून, ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंना संधी मिळावी, स्थानिक क्रिकेटपटूंना योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे तसेच युवकांमध्ये क्रीडाभावना वाढीस लागावी, या उद्देशाने असोसिएशन कार्यरत आहे.
कोलाड क्रिकेट असोसिएशनच्या नवनिर्वाचित कार्यकारणीमध्ये अध्यक्ष अभिजित खांडेकर, कार्याध्यक्ष राहुल शिंदे, उपाध्यक्ष विनोद सानप, सेक्रेटरी प्रथमेश खांडेकर, सहसेक्रेटरी, सर्वेश तेलंगे, खजिनदार योगेश लोटणकर, सहखजिनदार आशीष देशमुख यांची निवड करण्यात आली. यावेळी आमदार अनिकेत तटकरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष युवक अध्यक्ष राकेश शिंदे, रोहा पंचायत समिती उपसभापती संजय मांडलुस्कर,क्रिकेटप्रेमी बाळा महाबळे, मुरली बाईत, चिरंजीव भिंगारे,सचिन अमृस्कर,सतीश जाधव,मन्सूर पठाण, दिनेश लोटणकर यांच्यासह परिसरातील असंख्य क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.
अध्यक्षपदी अभिजित खांडेकर यांची निवड
