। अलिबाग । प्रतिनिधी ।
तैवानमध्ये होणार्या कलरॉक एक्सपोजर प्रोग्राम-2024 या सहकार परिषदेसाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून अलिबागमधील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित सुरेश पाटील व समता पतसंस्था, कोपरगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन भट्टड यांची निवड करण्यात आली आहे. तैवानमधील तयाचुंग शहरात 4 ते 8 नोव्हेंबर 2024 या कालावाधीत ही परिषद होणार आहे.यात आशिया खंडातील 20 देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
पब्लिक केडीट युनियन लीग आफ द रिपब्लिक ऑफ चायना (कलरॉक) यांच्यातर्फे कलरॉक एक्सपाजर प्रोग्राम आयोजित करण्यात आला आहे. या परिषेदत सहभागी होण्यसाठी असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फिडरेशन ऑफ क्रेडीत युनियन (एक्यू) यांनी प्रत्येक देशाकडून नावं मागविली होती. भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पतसंस्थांचा महासंघाने आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित सुरेश पाटील व समता पतसंस्था, कोपरगावचे सीईओ सचिन भट्टड या दोघांची निवड केली.
आशिया खंडातील ज्या 20 देशांमध्ये सहकारी पतसंस्था चालतात, त्या देशांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत. पतसंस्थांसमोर कोणत्या अडचणी आहेत. त्याचा सामना करून स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत, सभासदांच्या हितासाठी काय करावे लागेल यावर चर्चा होणार आहे. पब्लिक केडीट युनियन लीग आफ द रिपब्लिक ऑफ चायनाचे (कलरॉक) तज्ज्ञ या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेत प्रत्येक देशाचे प्रतिनिधी आपल्या देशातील पतसंस्था चळवळीचा परिचय करून देणार आहेत. पहिल्या दिवशी भारतातील पतसंस्थांबात माहिती देण्याची संधी अभिजित पाटील यांना मिळणार आहे.