बोडणी येथील जेट्टीच्या कामाबद्दल आ. जयंत पाटील आक्रमक…व्हिडीओ बघून ग्रामस्थांनी मानले आभार

उपमुख्यमंत्र्यांना भर सभागृहात विचारला जाब

अलिबाग तालुक्यातील बोडणी येथे मासळी उतरवण्यात येणाऱ्या मच्छीमार जेट्टीसाठी केंद्र सरकारचा निधी मिळाला मात्र राज्य सरकारने मंजूर करूनही तो वर्ग न केल्याने काम रखडले आहे. याबाबत पाच पाच पत्र लिहून देखील कार्यवाही न केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आ.जयंत पाटील यांनी जाब विचारला. त्यावर तातडीने दखल घेत उद्याच या विषयावर बैठक लावण्याचे आश्वासन दिले.

जेट्टीसाठी २०१९-२० च्या अर्थसंकल्पात रु. ४ कोटी व उर्वरित ४ कोटी रुपयांचा निधी केंद्राकडून उपलब्ध झाल्याने दि. १७. ०२. २०२० रोजी या कामाचे कंत्राट देण्यात आले. जेट्टीचे २० ते ३० टक्के काम पूर्णही झाले. राज्य शासनाने मंजूर केलेला ४ कोटी रुपयांचा निधी अद्याप वर्ग न केल्याने काम बंद पडले आहे.

या संदर्भात उपमुख्यमंत्र्यांना पाच व मुख्यमंत्र्यांना दोन पत्रे पाठवूनही कोणती कार्यवाही करण्यात आलेली नाही, हा मुद्दा शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी आज सभागृहात मांडला. यावेळी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार सभागृहात उपस्थित असल्याने त्यांनी तातडीने दखल घेत उद्याच या विषयावर बैठक लावण्याचे आश्वासन दिले.

Exit mobile version