| पेण | प्रतिनिधी |
पेण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मळेघर अॅरोसीटी रोड, कांदळेपाडा येथील मतिमंद मुलीवर रामवाडी, शिवाजीनगर, ता. पेण येथील आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याबाबतची तक्रार पीडित मुलीची बहीण व तिच्या पतीने पेण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादी व तिचे पती हे घराबाहेर कामावर गेले असता, फिर्यादीची पीडित बहीण ही घरात एकटीच असताना तिचे मतिमंदपणाचा फायदा घेऊन शेजारी राहणारा फिर्यादीचा दीर (आरोपी) याने फिर्यादीचे राहत्या घराच्या खिडकीतून घरात प्रवेश करुन पीडितेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तसेच वारंवार फिर्यादी व त्याचे घरातील लोकांना शिवीगाळी करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या गुन्ह्यातील आरोपीस दि.19 जुलै रोजी अटक करण्यात आली आहे. याबाबत पेण पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर अतिरिक्त कार्यभार पेण, श्री. शुल्का हे करीत आहेत.