। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शाळेत खेळण्यासाठी येत असलेल्या अल्पवयीन मुलाने पिडीत अल्पवयीन मुलीशी मैत्री करुन तिच्यावर जबरदस्तीने वारंवार शारिरिक संबंध करुन गर्भवती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कुरुळ येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतचे वृत्त असे की 01 जुलै ते 31 ऑगस्ट 2022 दरम्यान पिडीत मुलीच्या पुणे येथील शाळेत खेळण्यासाठी येत असलेला आरोपीने तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर झालेल्या मैत्रीचा गैरफायदा घेत कुरुळ येथील त्याच्या मित्राच्या घरी पीडीत मुलगी वय 13 वर्षे ही अल्पवयीन आहे हे माहीत असताना देखील तिच्यावर जुलै मध्ये वारंवार जबरदस्तीने शारीरीक संबंध करुन तिस 25 आठवडयांची गर्भवती केली. सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर पिडीत मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार केली.
त्यानुसार अलिबाग पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.क.376, 376 (2)(ळ)(प), बाल लै.अत्या.संरक्षण (पोस्को) अधिनियम 2012 चे कलम 3,4,5(क्ष)(2),5(ङ),6,7,8,10,12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक ओमप्रकाश कावळे हे करीत आहेत.